‘नाट्यसंगीत’ युवा कलाकारांचे व्यासपीठ
By admin | Published: December 16, 2014 09:54 PM2014-12-16T21:54:37+5:302014-12-16T23:42:43+5:30
विलास गावडे : वेंगुर्ल्याच्या कार्यक्रमात आठशेहून अधिक संगीतप्रेमींची उपस्थिती
वेंगुर्ले : येथील श्री सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वेंगुर्लेवासियांना नाट्यसंगीताची मेजवानी मिळाली आहे. युवा कलावंताना हे एक मोठे व्यासपीठ मिळाले असल्याचे प्रतिपादन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी केले.
सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात नाट्यदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच देवगड येथील संगीततज्ज्ञ डॉ. भा. वा. आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अरुण गोगटे, गुरुकुल संस्थेचे संस्थापक व संगीततज्ज्ञ भाई शेवरे (गोवा), व्यापारी मनमोहन दाभोलकर, उद्योजक दिगंबर नाईक, रवी रेगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नांदीने झाला. या कार्यक्रमास सुमारे ८०० हून अधिक संगीतप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)