शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

प्रकल्पग्रस्तांचे पैसे जूनमध्ये मिळणार

By admin | Published: May 25, 2015 11:41 PM

राजन तेली : तिलारीबाबतचे वनटाईम सेटलमेंट

सावंतवाडी : तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचला असून, यावर ३० जूनपर्यंत निर्णय होऊन प्रकल्पग्रस्तांचे धनादेशही त्यांच्या हातात पडणार आहेत. याबाबतची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली.तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तत्कालीन आघाडी सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नव्हते. गोवा सरकारने आपली रक्कम महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केली. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अटी व शर्थींमुळे उर्वरित रक्कम वर्ग करता आली नाही. अनेक वेळा तिलारी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. तसेच कालव्याचे पाणीही अडवले. याची दखल तत्कालीन काँग्रेस सरकारने हवी तशी घेतली नाही. अखेर अलिकडेच तिलारी प्रकल्पग्रस्तांनी या प्रश्नावरून पुन्हा आंदोलन केले. त्यानंतर प्रश्नाला वेग आला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीत तातडीेने महाराष्ट्र सरकार हे पैसे प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात वर्ग करेल, असे आश्वासन देण्यात आले असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावावर पैसे देण्याविषयी सहमती दर्शवत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. मुख्यमंत्र्यानी यावर सकारात्मक विचार केल्यास १५ ते ३० जूनपर्यंत हे पैसे प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता माजी आमदार राजन तेली यांनी बोलून दाखवली आहे. (प्रतिनिधी)