सिंधुदुर्गात पल्स पोलिओ लसीकरण

By Admin | Published: April 2, 2017 02:54 PM2017-04-02T14:54:01+5:302017-04-02T14:54:01+5:30

मोहिमेच्या शुभारंभाला मान्यवरांची उपस्थिती

Pulse Polio Vaccination in Sindhudurg | सिंधुदुर्गात पल्स पोलिओ लसीकरण

सिंधुदुर्गात पल्स पोलिओ लसीकरण

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. २ : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते बालकास लस पाजून रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथे करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी, डॉ. नलावडे, डॉ. सुनिल पाटील, डॉ. शिवशरण, नर्सींग स्कूलचे प्राचार्य चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पी. आर. चव्हाण व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी पल्स पोलिओ लसीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाने अत्यंत महत्वपूर्ण असे काम केले असून त्यामुळे २0११ पासून देशात एकही पोलिओ रूग्ण आढळलेला नाही असे सांगितले. पोलिओ लसीकरणातील हे यश असेच टिकवून पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, कोणालाही एकजरी बालक लस न घेतलेले आढळल्यास प्रत्येकाने व्यक्तिगत जबाबदारी समजून अशा मुलांना लसीकरणासाठी प्रवृत्त करूया, असे आवाहन देसाई यांनी केले.

पोलिओ लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यात उद्भवलेल्या सर्वच साथरोगांचा यशस्वी मुकाबला करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, असे गौरवोग्दार त्यांनी याप्रसंगी केले.

प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी केले. आभार निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नलावडे यांनी मानले. सूत्रसंचालन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पी. आर. चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व बालकांना मान्यवरांच्या हस्ते पोलिओचे प्रत्येकी दोन थेंब पाजून लसीकरण करण्यात आले.

Web Title: Pulse Polio Vaccination in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.