कोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 02:34 PM2020-12-25T14:34:28+5:302020-12-25T14:35:40+5:30

Konkan Railway- कोकण रेल्वे मार्गावर २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पुणे-एर्नाकुलम आणि एर्नाकुलम-पुणे अशी विशेष गाडी धावणार आहे .

Pune-Ernakulam special ferry on Konkan railway line | कोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष फेरी

कोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष फेरी

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष फेरी प्रत्येक बुधवार, रविवारी धावणार; कणकवली, सावंतवाडीत थांबा

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पुणे-एर्नाकुलम आणि एर्नाकुलम-पुणे अशी विशेष गाडी धावणार आहे .

पुणे - एर्नाकुलम ही गाडी प्रत्येक बुधवार आणि रविवारी तर एर्नाकुलम-पुणे ही गाडी प्रत्येक शुक्रवार आणि मंगळवारी धावणार आहे. या गाडीला कणकवली आणि सावंतवाडी स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

पुणे येथून सायंकाळी ६.४५ वाजता निघालेली पुणे - एर्नाकुलम (गाडी क्रमांक ०२०५१ ) एर्नाकुलम येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५० वाजता पोहोचणार आहे. तर एर्नाकुलम येथून पहाटे ५.१५ वाजता निघालेली एर्नाकुलम - पुणे (गाडी क्र मांक ०२०५२) ही गाडी दुसऱ्या दिवशी पुणे येथे पहाटे ५.५० वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला पनवेल, चिपळूण , रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुंदापुरा, उडपी, मंगलुरू आदी थांबे आहेत.
या गाडीचा फायदा कोकणातील विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.

 

Web Title: Pune-Ernakulam special ferry on Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.