खडी क्रशरविरोधात रॅली, ग्रामस्थांची घोषणाबाजी : तळेखोल गावातील क्रशर बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 05:43 PM2019-12-27T17:43:25+5:302019-12-27T17:45:57+5:30

तळेखोल गावातील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणास आठ दिवस उलटले तरी त्याकडे शासनाने पाठ फिरविल्याने हे उपोषण सुरूच राहिले. यावेळी तळेखोल ग्रामस्थांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. तर दोडामार्ग बाजारपेठेतून खडी क्रशर विरोधात रॅलीदेखील काढण्यात आली.

Rally against villagers crush, villagers declare: Close village crusher in Talekhole | खडी क्रशरविरोधात रॅली, ग्रामस्थांची घोषणाबाजी : तळेखोल गावातील क्रशर बंद करा

तळेखोल ग्रामस्थांनी खडी क्रशरच्या विरोधात दोडामार्ग शहरातून रॅली काढली.

googlenewsNext
ठळक मुद्देखडी क्रशरविरोधात रॅली, ग्रामस्थांची घोषणाबाजी तळेखोल गावातील क्रशर बंद करा

दोडामार्ग : तळेखोल गावातील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणास आठ दिवस उलटले तरी त्याकडे शासनाने पाठ फिरविल्याने हे उपोषण सुरूच राहिले. यावेळी तळेखोल ग्रामस्थांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. तर दोडामार्ग बाजारपेठेतून खडी क्रशर विरोधात रॅलीदेखील काढण्यात आली.

तळेखोल गावात सुरू असलेले खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

मात्र, या उपोषणाला आठ दिवस उलटले असताना अद्यापही शासनाने उपोषणाची दखल घेतलेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: उपोषणस्थळी येऊन चर्चा करावी आणि खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी असतानासुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे.

त्यामुळे हे उपोषण सलग आठव्या दिवशीही गुरुवारी सुरूच राहिले. शासनाने या उपोषणाकडे पाठ फिरविल्याने तळेखोल ग्रामस्थांनी शासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच दोडामार्ग शहरातून रॅलीदेखील काढण्यात आली.
 

Web Title: Rally against villagers crush, villagers declare: Close village crusher in Talekhole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.