कागदपत्रे सुरक्षिततेसाठी सावंतवाडीत रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:34 PM2020-10-31T12:34:17+5:302020-10-31T12:36:28+5:30
Sawantwadi, MuncipaltyCarporation, Recordsystem, sindhdurugbews सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच अॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. जुन्या फाइल, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी चार रेकॉर्ड रूम करण्यात आल्या आहेत. त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
सावंतवाडी : सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच अॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. जुन्या फाइल, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी चार रेकॉर्ड रूम करण्यात आल्या आहेत. त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, समृद्धी विर्नोडकर, नासीर शेख, उत्कर्षा सासोलकर, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, डॉ. उमेश मसुरकर उपस्थित होते.
नगराध्यक्ष परब म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेच्या फाईल सुसज्ज अशा जागेत पाहायला मिळणार आहेत. ३६ लाख रुपये खर्च करून जुने रेकॉर्ड फाईलसाठी चार रूम तयार करण्यात आल्या आहेत. अॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली आहे. सावंतवाडी नगरपालिका आता हायटेक होणार आहे. पारदर्शक जनताभिमुख काम केले जाणार आहे. कोरोना काळात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण अंतर्गत १८ हजार ५०० जणांची तपासणी करण्यात आली. शहरात २३ हजार ५०० लोकसंख्या आहे. अनेकजण बाहेरगावी गेले आहेत, असे परब यांनी सांगितले.