महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 PM2021-03-25T16:39:04+5:302021-03-25T16:40:22+5:30

sand Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. यात दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपरचा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले आहेत. अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

Revenue action on four dumpers in Sawantwadi | महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई

महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई

Next
ठळक मुद्देमहसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाईसंबंधित डंपर चालकांना नोटीस

सावंतवाडी : येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. यात दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपरचा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले आहेत. अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

येथील महसूल विभागाकडून अलीकडे ओव्हरलोड तसेच अनधिकृत वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास दहा डंपरवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.

आज पुन्हा एकदा दिवसभरात विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर वाळूचे डंपर तर बांदा, विलवडे परिसरांमध्ये पावडर वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली. संबंधित डंपर चालकांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Revenue action on four dumpers in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.