कणकवली : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे आज, सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले. परब यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडून परब यांची चौकशी सुरू आहे.परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली असून जवळपास १२ संशयित निष्पन्न झाले आहेत. यातील पुण्याचा सचिन सातपुते याच्या अटकेनंतर आमदार नीतेश राणे यांच्यासह राकेश परब यांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.राणे यांचा अर्ज जिल्हा, उच्च, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. तर परब यांचा अर्जही जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्याच पार्श्वभूमीवर परब हे स्वतःहून पोलिसांत हजर झाले.
संतोष परब हल्लाप्रकरण : आमदार नीतेश राणेंचे स्विय सहाय्यक पोलिसांसमोर हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:13 PM