महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटी प्रमुखपदी सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 03:26 PM2019-02-25T15:26:50+5:302019-02-25T15:29:19+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी तसेच नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे रविवारी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी प्रमुख पदी सतीश सावंत यांचा समावेश आहे.
कणकवली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी तसेच नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे रविवारी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी प्रमुख पदी सतीश सावंत यांचा समावेश आहे.
स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी संदीप मेस्त्री तर कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संध्या तेरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटी सदस्य म्हणून दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकणी, अॅड. संग्राम देसाई, प्रकाश राणे, संदीप कुडतरकर, बाळु कुबल, सुहास हडकर, सुदेश आचरेकर, मनिष दळवी, कृष्णनाथ तांडेल, रणजित देसाई, राजू बेग, विलास सावंत, संजना सावंत, भालचंद्र साठे यांचा समावेश आहे.
संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून देवगड, वेंगुर्ले,मालवण या तालुक्यांच्या संपर्क प्रमुखपदी दत्ता सामंत, सावंतवाडीसाठी मधुसुदन बांदिवडेकर, कुडाळसाठी संदीप कुडतरकर, दोडामार्गसाठी प्रमोद कामत, कणकवलीसाठी मनिष दळवी आणि वैभववाडीसाठी संदेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या प्रवक्तेपदी सतीश सावंत, संदीप कुडतरकर, भालचंद्र साठे, मनिष दळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे.स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुख पदी नासीर काझी तर अनुसुचित जाती व जमाती सेल प्रमुख पदी अंकुश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी संतोष नाणचे, तर कुडाळ तालुकाध्यक्षपदी विनायक राणे आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी विष्णूदास उर्फ दादा कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमान पक्षाच्या सरचिटणीसपदी मनिष दळवी यांची तर चिटणीसपदी रमेश दळवी आणि दीपक नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.