Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024: सावंतवाडीत दीपक केसरकरांचे निर्विवाद वर्चस्व, विजयाकडे वाटचाल

By अनंत खं.जाधव | Published: November 23, 2024 12:16 PM2024-11-23T12:16:58+5:302024-11-23T12:17:44+5:30

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. मोठे मताधिक्य मिळवल्यानंतर ...

Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024 MahaYuti candidate Minister Deepak Kesarkar is moving towards victory In Sawantwadi Assembly Constituency | Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024: सावंतवाडीत दीपक केसरकरांचे निर्विवाद वर्चस्व, विजयाकडे वाटचाल

Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024: सावंतवाडीत दीपक केसरकरांचे निर्विवाद वर्चस्व, विजयाकडे वाटचाल

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. मोठे मताधिक्य मिळवल्यानंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर एकच जल्लोष केला. सावंतवाडीचा गड केसरकर यांनी राखत विजयी चौकार मारला आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी वाटणारी लढत अखेरच्या टप्यात तिरंगी झाली. महायुतीकडून मंत्री दीपक केसरकर तर महाविकास आघाडी कडून उद्धवसेनेकडून राजन तेली, अपक्ष विशाल परब यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. त्यात पहिल्यापासूनच दीपक केसरकर यांचे पारडे जड होते.

पहिल्या फेरीत 2100 चे मताधिक्य केसरकर यांना मिळाले होते त्यानंतर या मताधिक्यात वाढ होत गेली. आणि चौदाव्या फेरी अखेर 26000 चे मताधिक्य केसरकर यांना मिळाले. तर अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी चांगली लढत दिली. मात्र केसरकर यांनी विजयी चौकार मारत आपणच सावंतवाडीचे किंगमेकर असल्याचे दाखवून दिले.

Web Title: Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024 MahaYuti candidate Minister Deepak Kesarkar is moving towards victory In Sawantwadi Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.