देवगड : देवगड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकणारा फरार झाला असून, पोलिसांनी खाजकुहिली टाकण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गिर्ये येथील महा ई सेवा केंद्राचे चालक रामचंद्र अनाजी शिर्के यांना अटक केली आहे. त्यांना देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज यमनूर चव्हाण (३७) कार्यालयात कामकाज करीत असताना त्यांच्या अंगावर गुरुवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने खाजकुहिली टाकली. या प्रकाराने महसूल प्रशासनात खळबळ उडाली होती.दरम्यान शिवराज चव्हाण यांनी याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीमध्ये गुरुवारी आपण कार्यालयात काम करीत असताना रेशनिंगबाबत अनेक व्यक्ती कार्यालयात आल्या होत्या. आपल्यासमोर यावेळी गिर्ये येथील महा ई सेवा केंद्रचालक रामचंद्र शिर्के हे आले होते. त्यांच्या पाठोपाठ राखाडी रंगाचा शर्ट परिधान केलेली व तोंडाला मास्क बांधलेली अज्ञात व्यक्ती आपल्या टेबलाजवळ आली. यावेळी शिर्के यांनी थांब थांब मी बाहेर जातो, असे त्याला सांगितले आणि ते बाहेर जात असतानाच ती अज्ञात व्यक्ती प्लास्टिक पिशवीतून आणलेल्या खाजकुहिलीच्या शेंगा डोक्यावर ओतून पसार झाली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, ती व्यक्ती पसार झाली.एक दिवसाची पोलीस कोठडीखाजकुहिली टाकण्याची कृती करण्यास शिर्के यांनी त्या व्यक्तीस प्रवृत्त केले, अशी तक्रार शिवराज चव्हाण यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित गिर्ये येथील महा - ई सेवा केंद्रचालक रामचंद्र अनाजी शिर्के (४०) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस हवालदार शैलेंद्र कांबळे याबाबत करीत आहेत.
अंगावर खाजकुहिली टाकणारा अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 5:40 PM
Police Sindhudurgnews- देवगड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकणारा फरार झाला असून, पोलिसांनी खाजकुहिली टाकण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गिर्ये येथील महा ई सेवा केंद्राचे चालक रामचंद्र अनाजी शिर्के यांना अटक केली आहे. त्यांना देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठळक मुद्देगिर्ये येथील महा ई-सेवा केंद्राच्या चालकाला अटक अंगावर खाजकुहिली टाकणारा अद्याप फरार