सिंधुदुर्गनगरी, दि. 16: सिंधुदुर्गनगरीत आंतरराष्ट्रीय जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त दिनांक 16 सप्टेंबर 2017 पासून ते दिनांक 02 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये लोक सहभागातून स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय निर्मल सागर तट स्वच्छता अभियान कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 16 सप्टेंबर 2017 रोजी वेळ 08.00 ते 10.00. बंदर कार्यालयाचे नांव- बंदर निरीक्षक रेडी बिचेसचे नांव - शिरोडा बीच. दिनांक 18 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00 बंदर कार्यालयाचे नांव - बंदर निरीक्षक मालवण- देवबाग बीच, बंदर निरीक्षक रेडी - सागर तिर्थ बीच. सहाय्यक बंदर निरीक्षक निवती - निवती- मेढा बीच, सहाय्यक बंदर निरीक्षक आचरा- आचरा बीच.
दिनांक 20 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00. बंदर कार्यालयाचे नाव - बंदर निरीक्षक वेंगुर्ला - दाभोली बीच, बंदर निरीक्षक देवगड- कुणकेश्वर बीच, बंदर निरीक्षक विजयदुर्ग- विजयदुर्ग बीच, बंदर निरीक्षक मालवण- तारकर्ली बीच. दिनांक 22 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00 बंदर कार्यालयाचे नाव - बंदर निरीक्षक रेडी - रेडी बीच, बंदर निरीक्षक वेंगुर्ला - वायंगणी बीच, बंदर निरीक्षक मालवण - वायरी भुतनाथ बीच, सहाय्यक बंदर निरीक्षक आचरा - मिठबांव बीच.
दिनांक 25 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00 बंदर कार्यालयाचे नांव - बंदर निरीक्षक वेंगुर्ला - उभादांडा बीच. सहाय्यक बंदर निरीक्षक निवती - भोगवे बीच, बंदर निरीक्षक देवगड - मिठमुंबरी बीच, बंदर निरीक्षक मालवण - तोंडवळी बीच, दिनांक 27 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00 बंदर कार्यालयाचे नांव - बंदर निरीक्षक वेंगुर्ला - मोचमाड बीच, सहाय्यक बंदर निरीक्षक निवती - खवणे बीच, बंदर निरीक्षक देवगड - तांबळडेग बीच, बंदर निरीक्षक विजयदुर्ग - गिर्ये बीच.
दिनांक 28 सप्टेंबर 2017 वेळ 08.00 ते 10.00 बंदर कार्यालयाचे नाव - सहाय्यक बंदर निरीक्षक निवती - केळूस बीच. दिनांक 02 ऑक्टोबर 2017 वेळ 09.00 ते 11.00 बंदर कार्यालयाचे नाव- बंदर निरीक्षक मालवण - मालवण जेट्टी परीसर राजकोट बीच असे राहिल. असे कप्तान अजित तोपनो, प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळविले आहे.