वाशीमध्ये १५ लाख आंबा पेट्यांची विक्री
By admin | Published: April 12, 2015 12:49 AM2015-04-12T00:49:51+5:302015-04-12T00:50:52+5:30
गतवर्षीपेक्षा १० लाख पेट्यांची तूट : शनिवारी मार्के टमध्ये झाली ५२ हजार पेट्यांची आवक
रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी
मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पाठविण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आतापर्यंत वाशी मार्केटमध्ये १५ लाख पेट्या पाठविण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १० लाखांनी घट झाली आहे. गतवर्षी २५ लाख पेट्या आतापर्यंत विक्रीस आल्या होत्या. शनिवारी मार्केटमध्ये ५२ हजार पेट्या विक्रीस आल्या असल्याची माहिती मुंबई कृ षी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.
गेल्या महिन्याभरात उष्म्याचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे मुंबई बाजारातील आवक दिवसेेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, १ हजार ते साडेतीन हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या आंब्याच्या ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व अन्य देशांमध्ये केली जात आहे. आखाती देशातून आंब्याला चांगली मागणी होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता, परंतु आवक वाढल्याने आता हा दर एक हजार ते साडेतीन हजारांपर्यंत खाली आला आहे.
परदेशी निर्यात सुरू झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहणे अपेक्षित होते. त्यातून शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काही अंशी भरून येण्यास मदत झाली असती, परंतु यावर्षीही अवकाळी नुकसानाबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (प्रतिनिधी)