सिंधुदुर्ग : फणसाचे गरे खाल्यानंतर शाळकरी मुलीचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:55 PM2018-06-18T15:55:35+5:302018-06-18T15:55:35+5:30
मालवण तालुक्यातील किर्लोस-गावठणवाडी येथील तन्वी ज्ञानेश्वर घाडीगावकर (११) हिचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी १७ जून रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. याबाबत ज्ञानेश्वर नानू घाडीगावकर (३८, रा. किर्लोस-गावठणवाडी, ता. मालवण) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील किर्लोस-गावठणवाडी येथील तन्वी ज्ञानेश्वर घाडीगावकर (११) हिचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी १७ जून रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. याबाबत ज्ञानेश्वर नानू घाडीगावकर (३८, रा. किर्लोस-गावठणवाडी, ता. मालवण) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तन्वी शनिवारी सायंकाळी शेतात गेली होती. त्या ठिकाणी तिने फणसाचे गरे खाल्ले व तिने गऱ्यांवर पाणी प्यायले व रात्री जेवल्यानंतर रात्री आराम करण्यासाठी झोपली असता तिच्या पोटात दुखू लागले. रात्रीची वेळ असल्याने नातेवाईकांनी तिच्यावर घरगुती उपाय केले, मात्र सकाळपर्यंत तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही.
तिला सकाळी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असता उपचाराला तिने साथ दिली नाही. तन्वीच्या आकस्मिक निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.