सिंधुदुर्ग :  वाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:46 AM2018-11-17T11:46:43+5:302018-11-17T11:48:56+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.

Sindhudurg: The government's work on sand wasted: Parashuram Upkar | सिंधुदुर्ग :  वाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग :  वाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देवाळूअभावी शासनाची बांधकामे ठप्प : परशुराम उपरकरवाळूचे दरही वाढले; पालकमंत्र्यांवर विकासकामांबाबत टीकास्त्र

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व शासन हे सर्वजण असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले. कोट्यावधीची कामे आणली अशा घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी विकास कामांची बांधकामे कुठे सुरू आहेत ती दाखवावी, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.


कुडाळ एमआयडीसीच्या विश्रामगृहावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाळा पावसकर, कुणाल किनळेकर, निलेश नेरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उपरकर यांनी सांगितले की, या जिल्ह्यात सुरुवातीला वाळू अल्पदरात म्हणजेच सात हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र आजच्या स्थितीला या वाळूचा दर सुमारे १५ ते २० हजार रुपये झाला आहे. त्यामुळे ही वाळू घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही.

सर्वसामान्यांच्या घरांची बांधकामे ठप्प झाली आहेत. तर दुसरीकडे शासनाला या वाळूचा दर परवडत नसल्याने त्यांचीही बांधकामे ठप्प झाली आहेत. वाळूच्या या वाढत्या दरामागे पालकमंत्री दीपक केसरकर येथील लोकप्रतिनिधी व शासन हेच पूर्णपणे जबाबदार आहेत व त्यांच्या आडमुठे धोरणामुळे हे वाळूचे दर वाढत आहेत, असेही उपरकर यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg: The government's work on sand wasted: Parashuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.