सिंधुदुर्गनगरी : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळाव्यास उदंड प्रतिसाद , राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:43 PM2017-12-29T14:43:52+5:302017-12-29T14:46:19+5:30

सिग्मा करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे वर्दे येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व मेळाव्यामध्ये राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवारांनी सहभाग घेतल्याने मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेश देण्यात आला.

Sindhudurg Nagar: A total of 184 candidates from across the state participated in a massive response to the Police recruitment program. | सिंधुदुर्गनगरी : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळाव्यास उदंड प्रतिसाद , राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवार सहभागी

सिग्माच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी उमेदवारांची मैदानी परीक्षा घेण्यात आली.

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळाव्यास राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवार सहभागी मेळाव्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यांसह राज्यभरातून उमेदवारमैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेशसंघर्ष करा, संधीचे सोने करा : कोळी

सिंधुदुर्गनगरी : सिग्मा करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे वर्दे येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व मेळाव्यामध्ये राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवारांनी सहभाग घेतल्याने मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेश देण्यात आला.

सिग्मा अ‍ॅकॅडमीमार्फत मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे आठ वाजता मेळाव्याचा शुभारंभ वेंगुर्ले पोलीस निरीक्षक एस. बी. कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मैदानी परीक्षा घेण्यात आली. यात गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स, १००, १६०० व ८०० मीटर धावणे प्रकार घेण्यात आले. त्यानंतर लेखी व मैदानी परीक्षेचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला.

यात प्रथम आलेल्या तेरा उमेदवारांना सिग्मा अ‍ॅकॅडमीमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला. यामध्ये आफान शेख, दर्शन भालेकर, सागर गावडे, बाबू घाडीगावकर, सविता कलिंगणे, ऋतुजा सावंत, दर्शना गावकर, अपर्णा भोसले, अदिती पुजारे, प्रथमेश जळवी, अभिजीत जळवी, जगन्नाथ वेळकर, एकनाथ गुरव यांचा समावेश आहे. या मेळाव्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यांसह राज्यभरातून उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

संघर्ष करा, संधीचे सोने करा : कोळी

उपस्थित यशस्वी उमेदवारांचे सिग्माच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिग्माचे संचालक एस. जी. ठाकुर, एस. व्ही. भोगले, प्राचार्य एस. जे. लोखंडे, प्राध्यापिका सविता ओटवणेकर, जी. एस. कांबळे, पी .व्ही. खरात, एच. पी. आजगावकर, व्यवस्थापक जे. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक कोळी यांनी उपस्थित उमेदवारांना संघर्ष करा, प्रत्येक संधीचे सोने करा अशा शब्दात मार्गदर्शन केले.

 

Web Title: Sindhudurg Nagar: A total of 184 candidates from across the state participated in a massive response to the Police recruitment program.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.