सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज १ जानेवारीपासून आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:48 PM2017-12-30T16:48:18+5:302017-12-30T16:51:13+5:30
सिंधुदुर्गनगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज येत्या १ जानेवारीपासून आॅनलाईन होणार आहे तशा हालचाली सुरू झाल्या असून या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज येत्या १ जानेवारीपासून आॅनलाईन होणार आहे तशा हालचाली सुरू झाल्या असून या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदत होणार आहे.
आपल्याला नवीन शिकवू अथवा पक्के वाहन परवाना मिळावा, वाहकाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले आदीसाठी संबंधित वाहन मालक चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालयात यावे लागते. मात्र, या ठिकाणी आल्यावर या कार्यालयाची कामकाजाची पद्धत समजत नसल्याने वाहन चालकांना येथील एजंटांची मदत घ्यावी लागते.
वाहन चालकांकडून या एजंटांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही एजंटांनी वाहन चालकांची लुबाडणूक सुरु केली होती. याबाबत अनेक वेळा वाहन चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे लक्ष वेधत नाराजीही व्यक्त केली होती.
तसेच हे कार्यालय एजंटमुक्त करण्याची मागणी केली होती. एजंटांपासून वाहन चालकांची मुक्तता करण्यासाठी कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन केले जात असल्याचे बोलले जात आहे.
शिकावू व पक्की अनुज्ञप्ती, वाहकांची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले, वाहन संबंधित चाचण्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्याचे बंधनकरक करण्यात आले आहे. ही कार्यवाही १ जानेवारी २०१८ पासून अंमलात आणली जाणार आहे.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकावार दौऱ्याच्या जानेवारी २०१८ ते जून २०१८ पर्यंतच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
जानेवारी २०१८ - सावंतवाडी दिनांक ३ व ११, मालवण दिनांक ४, कणकवली दिनांक ५ व १२, देवगड दिनांक ८, वेंगुर्ला दिनांक ९, दोडामार्ग दिनांक १५, कुडाळ १६, वैभववाडी १८.
फेब्रुवारी - सावंतवाडी दिनांक ५ व १५, मालवण ६, कणकवली ८ व १६, देवगड ९, वेंगुर्ला १४, दोडामार्ग २०, कुडाळ २१, वैभववाडी २२.
मार्च - सावंतवाडी दिनांक ५ व १३, मालवण दिनांक ६, कणकवली दिनांक ८ व १५, देवगड दिनांक ९, वेंगुर्ला दिनांक १२, दोडामार्ग दिनांक १६, कुडाळ दिनांक १९, वैभववाडी दिनांक २०.
एप्रिल २०१८-सावंतवाडी दिनांक ४ व १२, मालवण दिनांक ५, कणकवली दिनांक ६ व १३, देवगड दिनांक ९, वेंगुर्ला दिनांक १०, दोडामार्ग दिनांक १६, कुडाळ दिनांक १७, वैभववाडी दिनांक १९.
मे - सावंतवाडी दिनांक ७ व १५, मालवण ८, कणकवली १० व १७, देवगड ११, वेंगुर्ला १४, दोडामार्ग १८, कुडाळ २१, वैभववाडी २२.
जून - सावंतवाडी दिनांक ४ व १२, मालवण दिनांक ५, कणकवली दिनांक ७ व १४, देवगड दिनांक ८, वेंगुर्ला ११, दोडामार्ग १५, कुडाळ १८, वैभववाडी १९. दौरा कार्यक्रमाच्या ठिकाणी शिकावू व पक्की अनुज्ञप्ती, वाहकाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले संबंधी चाचणी १ जानेवारी २०१८ पासून सारथी ४.० वर आॅनलाईन पध्दतीने भरलेल्या व शुल्क भरलेले अर्ज स्विकारण्याचे कामकाज केले जाईल.
सेवेचा लाभ घ्या
विहीत अर्ज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल. तसेच वरील तारखांना कोणतीही सुटी असल्यास सदर ठिकाणचा दौरा इतर ठिकाणचा दौरा आटोपल्यावरच लगेच कामाच्या दुसऱ्या दिवशी होईल. अर्जदारांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.