सिंधुदुर्ग : भरतगड किल्ल्यावर एनसीसीचा ट्रेकिंग कॅम्प, ७० विद्यार्थ्यांनी केली २० किमी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:48 PM2017-12-26T12:48:04+5:302017-12-26T12:52:00+5:30
मालवण नगरपालिकेला १०० वर्षे तसेच किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग ते भरतगड किल्ला या वीस किमी मार्गावर पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. एकदिवसीय ट्रेकिंग कॅम्पमध्ये एनसीसी प्रमुख डॉ. एम. आर. खोत यांच्यासह ७० एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.
मालवण : मालवण नगरपालिकेला १०० वर्षे तसेच किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग ते भरतगड किल्ला या वीस किमी मार्गावर पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. एकदिवसीय ट्रेकिंग कॅम्पमध्ये एनसीसी प्रमुख डॉ. एम. आर. खोत यांच्यासह ७० एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.
मालवण बंदरजेटी ते भरतगड किल्ला या मार्गावर ट्रेकिंग कॅम्पचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ट्रेकिंग कॅम्पचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचा गावच्या वतीने मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सत्कार केला. या विद्यार्थ्यांनी मालवण ते मसुरेपर्यंत चालत येऊन संपूर्ण भरतगड किल्ला स्वच्छता व ट्रेकिंग केले.
यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले, के. के. राबते, देविदास हारगिले, मसुरे प्राचार्य आर. बी. पवार, समाजसेवक उदय बागवे, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर, विलास मेस्त्री, माजी उपसभापती छोटु ठाकुर, विनोद मोरे, महेश खोत, सुदर्शन मसुरकर, कमलेश ठाकुर, भाग्यश्री पावसकर, सुप्रिया परब, विजेता वेंगुर्लेकर, महेश बागवे, कोतवाल चव्हाण आदी उपस्थित होते.