सिंधुदुर्ग : कणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:11 PM2018-11-16T12:11:13+5:302018-11-16T12:13:01+5:30

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार आहे.

Sindhudurg: Planning for the rehabilitation of the traders of Kankavali started: Sameer Nalawade | सिंधुदुर्ग : कणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे 

सिंधुदुर्ग : कणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे 

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार असून त्याठिकाणी संबधित व्यापारी तसेच विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे उपस्थित होते.

समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक , झाडे अशा अनेक गोष्टी महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याबरोबर मुख्याधिकारी , नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली . आमचे म्हणणे आम्ही मांडले.

त्यामध्ये कणकवली शहरातील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. नगरपंचायतीच्या मालकीचे विजेचे खांब काढून महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या ताब्यात दिले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा विजेचे खांब ते उभारून देणार आहेत.

शहरात फ्लाय ओव्हर झाल्यावर सुमारे 500 मीटर अंतरावर एक अशी शहरात स्वच्छता गृहे बांधून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. पदपथांबरोबरच महामार्गाच्या दुतर्फा गटारे बांधली जाणार असल्याने शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.

डी.पी. रोड जवळील आरक्षण विकसित झाल्यावर नगरपंचायत नियमाला अधीन राहून तेथील गाळ्यात व्यापारी, विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांचे पुनर्वसन नगरपंचायत करणार आहे. कोणतीही वशीले बाजी न करता सर्वाना समान न्याय दिला जाईल.

इतरत्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदार सूरू असताना आमदार नीतेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निदान एक वर्ष तरी कणकवलीतील व्यापाऱ्याना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो.

महामार्गाच्या 45 मीटर अंतराच्या निसबाहेर 6 मीटर अंतर सोडून नवीन बांधकाम करायला परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड उभरण्याबाबत आमचे नियोजन सुरू आहे. तसेच व्यापारी , नगरसेवक , मुख्याधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन नवीन बांधकामा बाबत निर्णय घेण्यात येईल.

शहरातील व्यापारी, हॉकर्स, भाजी विक्रेते यांची यादी बनविण्यात आली आहे. सद्य स्थितीत भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हर्णे आळी तसेच अन्य ठिकाणी जागा मालकांबरोबर बोलणी सुरु आहेत.

भेळ तसेच इतर खाद्य पदार्थ विक्रेते यांना त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जानवली नदिवरील गणपती साना येथील रस्त्याच्या दुतर्फा जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याठिकाणी खाऊ गल्ली उभारण्याचा आमचा विचार आहे. असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.

...तर व्यापारी वाचले असते!

कणकवली शहरातील व्यापारी तसेच झाडांचा पुळका काही सत्ताधाऱ्याना आता आला आहे. पूर्ण क्षमतेने यापूर्वीच त्यांनी प्रयत्न केले असते तर उध्वस्त होण्यापासून व्यापारी निश्चितच वाचले असते. झाडेही नष्ट झाली नसती. मात्र, महामार्गाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या सत्ताधाऱ्याना आता जाग आली आहे. अशी टिका समीर नलावडे यांनी यावेळी केली.

Web Title: Sindhudurg: Planning for the rehabilitation of the traders of Kankavali started: Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.