सिंधुदुर्ग : चक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:09 PM2018-05-30T18:09:14+5:302018-05-30T18:09:14+5:30

कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.

Sindhudurg: Tornadoes of Hurricanes, Tanada in Kudal taluka | सिंधुदुर्ग : चक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण

कुडाळ-केळबाईवाडी येथील प्रदीप कुडाळकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

Next
ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण वीजपुरवठा खंडित, मालमत्तेचे मोठे नुकसान

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसासमवेत वादळ झाल्याने वीज कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडाळ तालुक्यात चक्रीवादळासह पावसाचे जोरदार आगमन झाले.


शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळला.

पावसापेक्षा वादळी वाऱ्यानेच कहर केल्याने तालुक्यात ठिकठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळल्याने तसेच भैरववाडी, लक्ष्मीवाडी व इतर काही भागात वीज तारा कोसळल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळल्याने विद्युत तारा तुटून तेथील रस्त्यावर कोसळल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प होती. घटनास्थळी पोलीस व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी येत तेथील विद्युत तारा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सोमवारी रात्री वादळी वाऱ्यात कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील प्रदीप कुडाळकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे सुमारे ३५ हजार रुपयांचे, तर तेथीलच उदय कुडाळकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडल्याने सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. कविलकाटे येथील रस्त्यानजीकचा मोठा वृक्ष कोसळला होता. एकंदरीत मान्सूनपूर्वने कुडाळ तालुक्यात जोरदार धमाका केला. याचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला आहे.

ग्रामीण भागातही वादळाचा प्रभाव

तालुक्यातील कडावल, भडगाव बुद्रुक भागातही वादळाचा प्रभाव दिसून आला. कडावल-बाजारवाडी येथील निर्मला प्रभाकर मोरजकर यांच्या मांगरावर पपईचे झाड पडून ११ हजार ७५०, भडगाव-मलाडवाडी येथील आनंद भगवान लोट यांच्या शेतमांगरावरील पत्रे उडून गेल्याने तसेच लोखंडी अँगल वाकल्याने १ लाख ७४ हजार, पावशी-मिटक्याचीवाडी येथील मधुकर सोमा करंगुटकर यांच्या घरावर माड कोसळून ५० हजारांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तलाठ्यांनी पंचनामे केले.

 

Web Title: Sindhudurg: Tornadoes of Hurricanes, Tanada in Kudal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.