सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसासमवेत वादळ झाल्याने वीज कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडाळ तालुक्यात चक्रीवादळासह पावसाचे जोरदार आगमन झाले.
सिंधुदुर्ग : चक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:09 PM
कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.
ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण वीजपुरवठा खंडित, मालमत्तेचे मोठे नुकसान