सिंधुदुर्ग : घनकचरा व्यवस्थापनात वेंगुर्ले नगर परिषद देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:48 PM2018-06-09T13:48:33+5:302018-06-09T13:48:33+5:30
घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिंधुदुर्ग : घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने गुरुवारी सायंकाळी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सीएसई दिल्ली यांच्यामार्फत संपूर्ण देशात २० नगरपालिकांची निवड करून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. यात वेंगुर्ले नगरपालिका सर्वाधिक ९१ गुण मिळवून प्रथम आली आहे. तर पाचगणी नगरपालिका देशात दुसरी आली आहे.
सीएसईचे उपमहाव्यवस्थापक चंद्रभूषण व छत्तीसगड अतिरिक्त आयुक्त रितू सेन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्याधिकारी वैभव साबळे यांना प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल वेंगुर्ले नगर परिषदेचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.