सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रेपुर्वी सर्व मुलभुत सुविधा पुर्ण कराव्यात : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:11 PM2017-12-29T14:11:15+5:302017-12-29T14:13:46+5:30
आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपुर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाणीची सुविधा, विद्युत व्यवस्था, बी.एस.एन.एल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे आरोग्य सुविधा, एस.टी. वाहतुक या सर्व मुलभूत सुविधा यात्रेपुर्वी पुर्ण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत केली.
सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपुर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते आंगणेवाडी येथे पिण्याच्या पाणीची सुविधा, विद्युत व्यवस्था, बी.एस.एन.एल ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे आरोग्य सुविधा, एस.टी. वाहतुक या सर्व मुलभूत सुविधा यात्रेपुर्वी पुर्ण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत केली.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सभेस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आंगणेवाडीसाठी स्वतंत्र व कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करण्याची सूचना करुन पालकमंत्री शकेसरकर म्हणाले की, बी.एस.एन.एल विभागाने टॉवरची क्षमता वाढवावी, एस.टी. विभागाने रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वित करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एस.टी. बसेसची व्यवस्था करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंगणेवाडीकडे जाणा-या सर्व रस्त्यांची डागडूजी यात्रेपुर्वी पुर्ण करावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, हेलीपॅडची सुविधा अधिकची हवी असल्यास तशी कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आंगणेवाडी यात्रेच्या वेळी आंगणेवाडी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शानाचे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन अधिक्षक कृषि अधिकारी व संबधित विभागाने निट - नेटके करावे असेही यावेळी पालकमंत्री केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.