लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवणार, सावंतवाडीत उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:25 PM2021-04-19T19:25:40+5:302021-04-19T19:28:29+5:30

CoronaVirus Sawantwadi Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्येचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता याव्यात यासाठी तालुक्यातील सरपंच आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यात आज बैठक पार पडली.  या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील लग्न सोहळ्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी या लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवून असणार आहे.

Special team will monitor the wedding ceremony, measures in Sawantwadi | लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवणार, सावंतवाडीत उपाययोजना

लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवणार, सावंतवाडीत उपाययोजना

googlenewsNext
ठळक मुद्देलग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवणारसावंतवाडीत कोरोना नियंत्रणासाठी तहसीलदार, सरपंच बैठक

सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्येचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता याव्यात यासाठी तालुक्यातील सरपंच आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यात आज बैठक पार पडली.  या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील लग्न सोहळ्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी या लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवून असणार आहे.

शासनाकडून देण्यात येणारे मोफत धान्य देखील रेशन दुकानदाराकडून प्रत्येक दिवस ठरवून त्या त्या वाडी मध्ये देण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना तपासणी रिपोर्ट घेऊन यावे लागणार आहे.

गावी येऊन तपासणी करावी लागणार आहे. तसेच गावी येऊन तपासणी केल्यास जो पर्यंत तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस १४ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.

Web Title: Special team will monitor the wedding ceremony, measures in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.