सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्येचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता याव्यात यासाठी तालुक्यातील सरपंच आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील लग्न सोहळ्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी या लग्न सोहळ्यावर विशेष टीम लक्ष ठेवून असणार आहे.
शासनाकडून देण्यात येणारे मोफत धान्य देखील रेशन दुकानदाराकडून प्रत्येक दिवस ठरवून त्या त्या वाडी मध्ये देण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना तपासणी रिपोर्ट घेऊन यावे लागणार आहे.
गावी येऊन तपासणी करावी लागणार आहे. तसेच गावी येऊन तपासणी केल्यास जो पर्यंत तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस १४ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.