कुडाळ / रजनिकांत कदम - प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालय संस्थेच्या वतीने कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय निमशासकीय संस्थामध्ये गुरूवारपासून (23 नोव्हेंबर) माझा भारत, व्यसनमुक्त भारत या राष्ट्रीय अभियानातंर्गत “माझा महाराष्ट्र, व्यसनमुक्त महाराष्ट्र” हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली असुन या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानातून व्यसनमुक्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने देण्यात आली.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालय ही संस्थेचे मुख्य कार्यालय राजस्थान येथील माऊंट अबू येथे असून गेली ८० वर्ष सुमारे १४० देशामध्ये ही संस्था समाजपयोगी विविध उपक्रम राबवित आहे. सन २००९ मध्ये या संस्थेने संपूर्ण भारतात स्वस्थ भारत हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले होते. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येदेखील नोंद झाली आहे.
अशा प्रकारे उपक्रम राबविणा-या या "प्रजापिता ब्रम्हाकुमारीज विश्वविद्यालय संस्थेच्या मेडिकल विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती २० जानेवारी २०१३ पासून संपूर्ण भारतात माझा भारत व्यसनमुक्त भारत हे राष्ट्रीय अभियान सुरू केले. या अभियानाचा शुभारंभ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून गेली तीन वर्षे हे अभियान देशभरात आयोजित केले जात असून यंदा चौथ्या वर्षी ही मोठ्या प्रमाणात हे अभियान राबविण्यात येत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात ही या अभियानाला सुरूवात झाली असून कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाला गुरूवारपासून (२३ नोव्हेंबर) कुडाळ तालुक्यातुन प्रारंभ झाला आहे. सदरचे हे अभियान कुडाळ तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल कुडाळ, हिर्लोक हायस्कूल, तुळसुली हायस्कूल, घावनळे हायस्कूल, पणदुर हायस्कूल, ओरोस हायस्कूल, पुष्पसेन सावंत विद्यालय हुमरमळा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात आले. तसेच शुक्रवारी व शनिवारी सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यातही हे अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानामुंळे अनेकजण व्यसमुक्त झाले असून संपूर्ण कोकणात हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. सचिन परब, प्रजापिता ब्रम्हाकुमारीज विश्वविद्यालय कुडाळ केंद्राच्या संचालिका हर्षा बहेनजी, मुंबई विक्रोळी येथील निलिमा दिदी, जयश्री दिदी, मिनल दिदी, शाम भाई, अजय भाई, तसेच कुडाळ केंद्राच्या ब्रह्माकुमारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
व्यसनापासून दूर रहा- डॉ. सचिन परबदेशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या विळख्यात अडकत असुन हे देशाच्या भवितव्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी हे सुरू केलेल्या अभियानामुंळे अनेक जण व्यसनमुकित झाले आहेत, अशी माहिती अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. सचिन परब यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.
प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरीकरणव्यसनाचे परिणाम काय होतात, धोके कोणते असतात व प्रत्येकजण व्यसनापासून दूर रहावा या साठी संस्थेच्या वतीने प्रबोधनात्मक पथनाट्यातुन ही व्यसनमुक्तीचे धडे दिले.
शासनाकडून अभियानाचा गौरवदेशात व्यसन मुक्ती व्हावी या करीता गेली तीन वर्ष हे अभियान सुरू ठेवुन चौथ्या वर्षी ही मोठ्या प्रमाणात हे अभियान राबवून सामजहिताचे कार्य सुरू ठेवणा-या प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालय संस्थेचा शासनाने राजस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन सतत तीन वर्ष देऊन गौरव करण्यात आला आहे.