कुणकेश्वर - दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वरचा यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यात्रेची सर्व कामे वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यास सुरूवात झाली आहे. देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासकीय यंत्रणाकडून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे.व्यापारी बांधवानी दुकाने थाटायला सुरूवात केली असून कुणकेश्वर येथील मुंबईकर चाकरमानी मंडळीनीही कुणकेश्वर क्षेत्री उपस्थिती दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे यात्रेपूर्वीच कुणकेश्वरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई फुलांची आरास व इतर सजावट लक्षवेधी ठरणार आहे. शिवभक्तांना कमीत कमी वेळात दर्शन मिळण्यासाठी देवस्थान समितीकडून दर्शन रांगांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबर रांगेमधून दर्शन घेणाºया भाविकांचे प्रखर उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रशस्त मंडप व्यवस्थाही करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे यात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये यात्रा परिसर, समुद्रकिनारा, सागरी मार्ग या भागात सीसीटिव्हीची करडी नजर असणार आहे. त्या व्यतिरिक्त स्थानिक स्वयंसेवकांची पथके, पोलीस यंत्रणा विशेष लक्ष ठेवून असणार आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून वेळोवेळी यात्रोत्सवाचा आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियोजनाचा आढावा घेऊन संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. कुणकेश्वर येथे येणाºया सर्व रस्त्यांवर मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावण्याचे काम सुरू आहे. यात्रा काळात ठिकठिकाणांहून भाविक येत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क राहणार आहे. प्राथमिक शाळा व भक्तनिवास याठिकाणी दोन वैद्यकीय पथके त्याचबरोबर इळये व मिठबाव या प्राथमिक आरोग्य केंद्रावरही आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच चार रूग्णवाहिका सेवेसाठी यात्रास्थळी तत्पर असणार आहेत. एकूण १९० आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवा देणार आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कोंडके यांनी दिली. महाशिवरात्र उत्सव मंगळवारी असला तरी रविवार सुटीचा दिवस आणि लगेचच सोमवार असल्याने रविवारपासूनच उत्सवानिमित्त कुणकेश्वर मंदिर आणि परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. चौकटदेवस्थान ट्रस्ट, प्रशासनाकडून खबरदारी४यात्रेमधील हॉटेल्स, निरनिराळी दुकाने यांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने ट्रस्ट व प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. देवगड, मिठमुंबरी पुलामुळे भाविकांची विशेष सोय झाली असून देवदर्शनाबरोबर प्रचंड समुद्रकिनारा व त्यालगतच असलेल्या सुरूच्या बनातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे. त्यादृष्टीने चोख बंदोबस्तही पोलीस यंत्रणेकडून ठेवण्यात येणार आहे.४यात्रेमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश व्यापारी तसेच भाविकवर्गाला देण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्यांचेही नियोजन करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी निर्माण होणारा कचरा इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध केल्या आहेत.
कुणकेश्वरमध्ये जत्रौत्सवाची लगबग, शिवभक्त दाखल होण्यास सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 8:06 PM