रेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंध, सातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:30 PM2021-06-03T18:30:25+5:302021-06-03T18:31:51+5:30

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमेवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अचानक प्रशासनाने पवित्रा घेतल्याने सातार्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केल्यानंतर यावर तात्पुरता तोडगा निघाला असून, यापुढे कडक निर्बंध घातले जातील, असा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे.

Strict restrictions on border posts after red zone, large crowds on Satarda remote area | रेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंध, सातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

रेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंध, सातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देरेड झोननंतर सीमा नाक्यांवर कडक निर्बंधसातार्डा दूरक्षेत्रावर मोठी गर्दी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सीमेवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अचानक प्रशासनाने पवित्रा घेतल्याने सातार्डा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केल्यानंतर यावर तात्पुरता तोडगा निघाला असून, यापुढे कडक निर्बंध घातले जातील, असा इशारा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे. यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्याची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रवेश देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्याच्या काढलेल्या आदेशानुसार गोवा हद्दीलगत असलेल्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसमोर मोठी समस्या निर्माण झाली.

गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तींची आरोंदा व सातार्डा चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सातार्डा पोलीस दूरक्षेत्रावर जिल्ह्यातून गोव्यात व गोवा राज्यातून जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला जात असल्याने जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला गोव्यात न सोडण्याच्या सूचना दिल्या.

आरटीपीसीआर सात दिवसांसाठी वैध

ज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास तिचा रिपोर्ट सात दिवसांसाठी वैध राहील. मात्र सात दिवसांनंतर पुन्हा आर टी पी सी आर टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना गोव्यातून जा-ये करण्याची मुभा राहील, अशी माहिती तहसीलदार म्हात्रे यांनी दिली असल्याचे स्पष्ट केले.

रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणात रवानगी

या संदर्भात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांनी संपर्क साधून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य तो पर्याय काढावा, अशी विनंती केली असता आज गोव्यात जाणाऱ्या व्यक्तींना गोव्यात प्रवेश दिला जाईल. मात्र गोव्यातून जिल्ह्यात प्रवेश करीत असताना सर्व व्यक्तींची रॅपिड टेस्ट केली जाईल. ज्या व्यक्तींची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांना तत्काळ विलगीकरणात दाखल केले जाईल.

Web Title: Strict restrictions on border posts after red zone, large crowds on Satarda remote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.