कोल्हापूर- डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना (ॲनाटॉमी) विभागाच्या ट्युटर डॉ. सुप्रिया सातपुते यांना पीएच.डी. मिळाली.
"क्रेनिओफेशियल मॉरफॉलॉजी अँड डिफरंट फेशियल टाईप्स इन महाराष्ट्रा पॉप्युलेशनः अ सिफॅलोमेट्रिक ॲनालिसिस" या विषयात संशोधन करून त्यांनी प्रबंध सादर केला होता. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधन पत्रिकेमध्ये त्यांचे संशोधनात्मक 9 लेख प्रसिध्द झाले आहेत.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, कुलगुरु डॉ.राकेश मुदगल, प्र- कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर. के शर्मा, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, उप प्राचार्य डॉ. आशालता पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उप कुलसचिव संजय जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. शरीररचना (ॲनाटॉमी) विभागप्रमुख आणि पीएच. डी. मार्गदर्शक डॉ. वसुधा निकम यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले.