कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक, वाहकांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे . असे असताना काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत . यापुढे जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्हयातील एसटी वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवणचे नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , एस . एस . नाडकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी कोरोनाच्या संकटापूर्वी सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या ४०० शेड्युल व १८०० फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी २७५ शेड्युल व १३१७ बसफेऱ्या आता सुरु झाल्या आहेत . १ डिसेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांना पास देणे चालू करण्यात आले आहे . मुंबई , ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक , वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत , अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .त्यावर जिल्हयातून प्रत्येक आगारातून सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांबाबतची माहिती वृत्तपत्रात द्या. तसेच बसस्थानकांवर दर्शनी भागात त्यांची माहिती लावण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या . तसेच प्रत्येक आगाराचा संपर्क नंबरही तिथे देण्यात यावा , असे स्पष्ट केले . यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६० टक्केहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे रसाळ यांनी सांगितले .जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत . ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी रसाळ यांनी सांगितले.कोणीही राजकारण करू नये !मुंबई , ठाणेहून आलेल्या चालक , वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये , तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्यादृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये . एसटीचे उत्पन्न वाढीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले .
जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:40 PM
Coronavirus, statetransport, vaibhavnaik, kankavli, sindhudurgnews जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!वैभव नाईक यांची सूचना; एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट