देवगड : तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारपट्टीवर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नाने तांबळडेग समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके, तांबळडेग सरपंच अजिंता कोचरेकर, उपसरपंच लवेश भाबल, भाजप देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सभापती रवि पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, माजी सभापती सुनील पारकर, प्रकाश राणे, बाळ खडपे, पंचायत समिती सदस्य निकिता कदम, ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचेकर, संजना मालंडकर, माजी उपसरपंच रमाकांत सनये, देवानंद केळूसकर, उदय कोंयडे आदी उपस्थित होते.
गेल्यावर्षी येथील समुद्रकिनारी लाटांमुळे किनारपट्टीची धूप व सुरूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तांबळडेग, मोर्वे, हिंदळे, मिठबाव या गावांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.नैसर्गिक आपत्तीमुळे या गावासह इतर गावांचे समुद्राच्या लाटांनी नुकसान होऊ नये यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न राहाणार नाही, असे मत नीतेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.