- अनंत जाधवसावंतवाडी - सिंधुदुर्ग कर्नाटक व कोल्हापूर जिल्हयांना जोडल्या जाणाºया संकेश्वर बांदा या महामार्गाचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्रिय रस्ते वाहातूक मंत्रालयाचे पथक बुधवारी सिंधुदुर्गात दाखल झाले या पथका ने गुरूवारी दिवसभर आंबोली तसेच बावळट इन्सुली मार्गाची पाहाणी केली आहे.हे पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच महामार्ग हस्तातंरासाठी लागणारी जमिन यांची माहीती घेत असून,हा मार्ग सावंतवाडीतून गेल्यास येणारा खर्च तसेच बावळट मार्गे होणारा खर्च आंबोली घाट रस्त्याची माहीती हे पथक घेत आहे.नव्याने केंद्र सरकारच्या रस्ते विकास विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले ला बांदा संकेश्वर मार्ग हा कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयांना जोडला जाणार आहे.या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी गेले दोन सिंधुदुर्ग मध्ये आले आहेत.या अधिकाºयांनी सुरूवाती ला संकेश्वर येथून या रस्त्याची सुरूवात होणार असल्याने तेथे पाहाणी केली त्यानंतर हे पथक सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाले आहे.बुधवारी या पथकाने सावंतवाडी येथे येउन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने तसेच उपविभागीय अभियंंता संजय आवटी यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर गुरूवारी या पथकाने प्रत्यक्ष सातुळी बावळट तसेच बांद्या पर्यंत जाउन पाहाणी केली त्यानंतर सावंतवाडी शहर व इन्सुली येथील रस्त्या ची पाहाणी केली.हे पथक प्रत्यक्ष रस्त्याची पाहाणी करणार असली तरी प्रामुुख्याने हा मार्ग कुठून बांदा येथे जोडणे सोयीस्कर होईल यांचीही माहीती घेत आहे.हे पथक रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करत असतनाच रस्त्याला प्रत्यक्षा त येणारा खर्च तसेच कमी होणारे अंतर भूसंपादन कमीत कमी होईल असा मार्ग ग्रामस्थांच्या समस्या यांची माहीती हे पथक घेउन तसे या अहवालात नमूद करणार आहे.या पथकामध्ये चार अधिकारी असून,या मार्गासाठी नेमण्यात आलेल्या खाजगी एजन्सीचे अधिकारी ही सहभागी झाले होते.पण सध्यातरी हे पथक कोणत्या मार्गावर शिक्कामोर्तब करणार हे अद्याप निश्चीत झाले नसून,सर्व अभ्यास केल्यानंतर केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग विभागा ला हा संपूर्ण अहवाल पथक देणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पथक आले आहे :श्रीकांत मानेया पथकाबाबत बांधकाम विभागाचे कार्यंकारी अभियंता श्रीकांत माने यांना विचारले असता,पुणे येथून आलेले पथक बांदा तसेच सातुळी बावळट येथील रस्त्याची पाहाणी करत आहे.तसेच त्यानी सावंतवाडी व इन्सुली येथील रस्त्याची ही पाहाणी बुधवारी केली आहे.हे पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच रस्त्यासाठी जागा हस्तातंरण याबाबत माहीती घेत आहेत.
कोकणातून कोल्हापूर, बेळगावला जाणाऱ्या संकेश्वर-बांदा मार्गाच्या अभ्यासासाठी पथक सिंधुदुर्गात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 11:39 PM