'मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:57 PM2020-10-13T16:57:58+5:302020-10-13T17:00:19+5:30

Temple, Nitesh Rane, sindhudurg 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत,​ ​राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

'Temple closed, bar open, lift your government' | 'मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार'

कणकवली येथे भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने प्रांतकार्यालया समोर आंदोलन छेडण्यात आले .

Next
ठळक मुद्देभजनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा भाजपचा प्रयत्न !कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कणकवली: 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत,​ ​राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी 'ठाकरे सरकार हाय हाय..,मंदिर खुली झालीच पाहिजेत ' अशा घोषणा देत ठाकरे सरकारवर टीका करणारी भजने तसेच गजर सादर करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ह्लझालो झालो झालो रे ..सरकारला कोरोना रेङ्घ,, तीन तिघाडा काम बिघडा..,उद्धवा तुझ्या मंदिरात न्याय नाहिरे बार केले खुले मात्र मंदिर नाही रे, ठाकरे ठाकरे तुझ्या गाडीला नाही चाकरे ,, चला गड्यानु चला गड्यानु मंदिर माझे खोलूया' अशा अनेक गजरातून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.

यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी कोकण विभाग संघटक प्रकाश पारकर ,जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली मंडल अध्यक्ष संतोष कानडे,राजन चिके, कणकवली सभापती दिलीप तळेकर, महेश गुरव,प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, सुचिता दळवी, स्वाती राणे, प्राची कर्पे ,साक्षी वाळके,सोनू सावंत, संदीप मेस्त्री, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, मिलिंद मेस्त्री, शिशिर परुळेकर ,पप्पू पुजारे,सदा चव्हाण , सचिन पारधीये, स्वप्नील चिंदरकर, संदीप सावंत, समर्थ राणे , समीर प्रभुगावकर, दशावतारी कलाकार आप्पा दळवी, सुरेश गुरव, भास्कर सामंत , मारुती सावंत, दामू घाडी आदी उपस्थित होते.

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच त्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जँबाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक व होमगार्ड प्रांताधिकारी कार्यालयाजवळ तैनात ठेवण्यात आले होते.

 

Web Title: 'Temple closed, bar open, lift your government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.