पाणी वाया जात असल्याने निशाण तलावाची तात्पुरती दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:11 PM2019-08-31T13:11:49+5:302019-08-31T13:13:36+5:30

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील निशाण तलावावरील गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तलावातील पाणी वाया जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच ...

Temporary repairs to Lake Tahoe | पाणी वाया जात असल्याने निशाण तलावाची तात्पुरती दुरुस्ती

पाणी वाया जात असल्याने निशाण तलावाची तात्पुरती दुरुस्ती

googlenewsNext
ठळक मुद्देनिशाण तलावाची तात्पुरती दुरुस्तीपाणी वाया जात असल्याने दुरुस्ती

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील निशाण तलावावरील गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तलावातील पाणी वाया जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच वेंगुर्ला नगरपरिषदेने याची दखल घेत गेटमधील बिघाड तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केल्याने तलावातील पाणी वाहून जाण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.

वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कॅम्प-वडखोल येथील निशाण तलावाचे गोडबोले गेट दरवर्षी १५ आॅगस्ट रोजी बंद करण्यात येते. मात्र, यावर्षी १५ आॅगस्ट उलटून गेल्यानंतर १० ते १५ दिवस होऊनही हे गेट बंद न करण्यात आल्याने येथील पाणी वाया जाऊन तलावातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.

परिणामी, एप्रिल-मे ऐवजी फेब्रुवारी-मार्चमध्येच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यातच नगरपरिषदेने गेट बंद करताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट व्यवस्थित न बसल्याने पाणी वाहून जात आहे, अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेत बुधवार २८ आॅगस्ट रोजी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात घट झालेली आहे.

दरम्यान, याबाबत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गोडबोले गेटच्या तंत्रज्ञांशी संपर्क केला असून संयुक्तरित्या पाहणी करण्यासाठी पत्र नगरपरिषदेकडून पाठविण्यात आले आहे. तरी तज्ज्ञांच्या पाहणीनंतर यावर कायमस्वरुपी उपाययोजना अवलंबली जाणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले आहे.

 

Web Title: Temporary repairs to Lake Tahoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.