दहशतवाद्यांनाच दहशत कळते; केसरकर यांचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:01 PM2019-04-23T12:01:21+5:302019-04-23T12:02:15+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजनच्या हस्तकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी काल ताब्यात घेतले.

Terrorists know terror; Deepak Kesarkar's to Narayan Rane | दहशतवाद्यांनाच दहशत कळते; केसरकर यांचा नारायण राणेंना टोला

दहशतवाद्यांनाच दहशत कळते; केसरकर यांचा नारायण राणेंना टोला

Next

सावंतवाडी : माझ्या व्यासपीठावर कोण बसले हे मला माहीत नाही. त्याची चौकशी केली जाईल. पण वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करावी हे हस्यास्पद आहे, असा टोला सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना लगावला. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजनच्या हस्तकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी काल ताब्यात घेतले. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी केली. निलेश उर्फ पटल्या पराडकर असे त्याचे नाव आहे. तो कणकवलीतील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. 


निलेश पराडकर हा कुख्यात गॅंगस्टर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या प्रचारात राजरोस फिरत होता. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला गुंड पराडकर विनायक राऊत आणि गृहराज्यमंत्री केसरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचारसभांमध्ये मांडीला मांडी लावून बसत होता. हा फरार गुंड सिंधुदुर्गत वावरत असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी आज रात्री ९ वाजता सापळा रचून कणकवलीतील एका हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पराडकरच्या नावावर खून, खुनाचे प्रयत्न, धमकी, खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.




पराडकरच्या अटकेनंतर नारायण राणे, निलेश आणि नितेश राणे यांनी केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. वैभव नाईक हे अर्ध्यातासात कणकवली पोलिस ठाण्यात पोहोचल्याचा आरोप केला होता. तर नितेश राणे यांनी केसरकर हे त्याच्यासोबत व्यासपीठावर असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. यावर केसरकर यांनी उत्तर दिले आहे. 



 

Web Title: Terrorists know terror; Deepak Kesarkar's to Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.