ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 06:05 PM2020-11-30T18:05:26+5:302020-11-30T18:08:12+5:30

bjp, shiv sena, ravindrachavan, sindhudurng राज्यसरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे. फक्त विविध आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. तर कोकणच्या तोंडाला एकप्रकारे पानेच पुसली आहेत. अशी टीका माजी राज्यमंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी येथे केली.

Thackeray government wipes leaves from Konkan's mouth! : Ravindra Chavan | ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाण

ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाण

Next
ठळक मुद्दे ठाकरे सरकारने कोकणच्या तोंडाला पानेच पुसली ! : रवींद्र चव्हाणकेंद्र शासनाने दिली विविध माध्यमातून मदत

कणकवली : गेल्या वर्षभरामध्ये ठाकरे सरकार हे सर्वदृष्टीने अपयशी ठरले आहे. केंद्रसरकारने शेतकरी, मच्छिमार बांधवाना मदत केली . पण राज्यसरकारने या सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे. फक्त विविध आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. तर कोकणच्या तोंडाला एकप्रकारे पानेच पुसली आहेत. अशी टीका माजी राज्यमंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी येथे केली.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्यावतीने माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली. तसेच राज्य सरकारवर निशाणा साधला.

यावेळी आमदार नितेश राणे, शरद चव्हाण , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रसन्ना देसाई, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष राजन चिके, बबलू सावंत, समर्थ राणे उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री चव्हाण म्हणाले,महाविकास आघाडीने गेल्या एक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही विशेष केलेले नाही. भाजपाने लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म पाळला. मात्र, विधानसभेला शिवसेनेने युती धर्म पाळला नाही. हा इतिहास आहे.त्यावेळी एनडीएत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष होता. मात्र , आम्ही युती धर्म पाळणार नाही याची शिवसेनेने कणकवलीतून नांदी केली आणि कणकवली मतदार संघातून आपला उमेदवार दिला.

त्यावेळी सर्वजण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असताना शिवसेनेने मात्र त्यात खोडा घातला आणि महाआघाडी सरकार स्थापन केले. त्यांनी सुरू असलेले प्रकल्प तसेच योजना कशा बंद होतील ? यावर लक्ष दिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात निर्णयच घेत नव्हते. तर ठाकरे सरकारने निर्णय घेतले . पण ते स्थगिती देण्याचे होते.

फडणवीस सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बजेट वाढत होते. ते आज कमी झाले आहे. कोरोना काळात ठाकरे सरकारने जिल्ह्याला काहीच दिले नाही. मोदी सरकारने शेतकऱ्याना मदत ,जनधन योजना, उज्वला गॅस, मोफत धान्य अशी विविध मदत केली. मात्र राज्य सरकारने काहिही दिलेले नाही. फयान वादळाची नुकसान भरपाईही दिली नाही. मच्छीमार समाजला वाऱ्यावर सोडले. गेल्या एक वर्षात त्यांना आधार मिळेल असे काही पॅकेज दिले नाही.

जनतेला दिला शॉक !

हे तिघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी फक्त गरिबांची थट्टा केली आहे. कोरोना काळात लोकांना खायला पैसे नाहीत. तेथे विजेची भरमसाठ बिले वाढवून दिली आहेत. सरकारच्या वर्षीपूर्तीलाच त्यांनी जनतेला शॉक दिला आहे. असेही रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

काजू, आंबा पिकांना हमीभाव नाही !

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कारभार पाहता प्रशासक नियुक्त करणे गरजेचे आहे.चुकीच्या पद्धतीने नोकर भरती सुरू आहे. राज्य सरकार कोकणाला दुजाभाव देताना दिसत आहे .काजू, आंबा पिकांना हमीभाव नाही.आयुर्वेदिक संशोधन महाविद्यालय जिल्ह्याबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.हे योग्य नव्हे. असेही रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

Web Title: Thackeray government wipes leaves from Konkan's mouth! : Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.