स्विफ्ट पक्षाची सर्वांत मोठी वसाहत नष्ट होण्याची भिती, हवामान बदलाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:18 PM2024-12-10T16:18:54+5:302024-12-10T16:20:31+5:30

वेंगुर्ला समुद्रातील बेटांवर वसाहत, शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला दिला आराखडा

The largest colony of the Swift Party on the islands of the Vengurla Sea is feared to be destroyed, threat of climate change | स्विफ्ट पक्षाची सर्वांत मोठी वसाहत नष्ट होण्याची भिती, हवामान बदलाचा धोका

स्विफ्ट पक्षाची सर्वांत मोठी वसाहत नष्ट होण्याची भिती, हवामान बदलाचा धोका

संदीप बोडवे

मालवण : एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ला द्वीप समूहातील बर्न आयलँड (Burnt Island) बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडियन स्विफ्टलेट) या पक्ष्याच्या जगातील सर्वांत मोठी वीण वसाहत नष्ट होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. शास्त्रज्ञांनी याबाबत संवर्धन आराखडा तयार केला असून असून हा आराखडा भारत सरकारला सादर करण्यात आला आहे. 

सॅकॉनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची, डॉ. गोल्डिन क्वॉरडोज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या एका प्रकल्पाअंतर्गत २०२० पासून महाराष्ट्रातील पाकोळी पक्ष्यांच्या वसाहतींचे संशोधन करीत आहेत. 

अद्भुत पक्षी, भारतीय पाकोळी एकपत्नीव्रत असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना एपोडेडी म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत. त्यांचे पंजे मजबूत असल्याने ते लटकू शकतात. अमेरिकेतील ऑइल बर्ड या एकमेव पक्ष्याप्रमाणे अंधारात प्रवास करून आपले मूळ स्थान शोधण्याची त्यांना कला अवगत आहे. 

बेटे संरक्षित क्षेत्र घोषित करा

वेंगुर्ला (नीवती) रॉक्स हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचा द्वीपसमूह आहे. या बेटांवर असलेल्या भारतीय पाकोळी पक्षाच्या वसाहतीला वातावरण बदलाचा (climate change) धोका उद्भवला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या आराखड्यात शासनाला काही निर्देश दिले आहेत. जगातील सर्वात समृद्ध असलेली वेंगुर्ला रॉक्स समुद्री बेटावरील भारतीय पाकोळीची वसाहत वाचवायची असेल तर हि बेटे संरक्षित क्षेत्र घोषित करणे गरजेचे आहे. शासनाच्या वन, महसूल, कृषी, पर्यावरण आदी विभागांना सुध्दा यात सहभागी व्हावे लागणार असल्याचे धनुषा कावलकर म्हणाल्या. 

बर्न आयलँड जगातील सर्वात मोठी वसाहत 

जगात भारतीय पाकोळीच्या १३ वसाहती आहेत. या पैकी भारतात ७ वसाहिती असून वेंगुर्ला (नीवती) रॉक्स बेटांवरील पाकोळी पक्षाची वसाहती जगातील सर्वात मोठी वसाहत आल्याचे समोर आले आहे. येथील २३ बेटांपैकी बर्न आयलँड (Burnt Island) या बेटावर ६१ मी. लांब आणि १८ मी. उंच असलेल्या सागरी गुहेत ही वसाहत आहे. 

Web Title: The largest colony of the Swift Party on the islands of the Vengurla Sea is feared to be destroyed, threat of climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.