शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

स्विफ्ट पक्षाची सर्वांत मोठी वसाहत नष्ट होण्याची भिती, हवामान बदलाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 4:18 PM

वेंगुर्ला समुद्रातील बेटांवर वसाहत, शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला दिला आराखडा

संदीप बोडवेमालवण : एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ला द्वीप समूहातील बर्न आयलँड (Burnt Island) बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडियन स्विफ्टलेट) या पक्ष्याच्या जगातील सर्वांत मोठी वीण वसाहत नष्ट होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. शास्त्रज्ञांनी याबाबत संवर्धन आराखडा तयार केला असून असून हा आराखडा भारत सरकारला सादर करण्यात आला आहे. सॅकॉनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची, डॉ. गोल्डिन क्वॉरडोज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या एका प्रकल्पाअंतर्गत २०२० पासून महाराष्ट्रातील पाकोळी पक्ष्यांच्या वसाहतींचे संशोधन करीत आहेत. अद्भुत पक्षी, भारतीय पाकोळी एकपत्नीव्रत असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना एपोडेडी म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत. त्यांचे पंजे मजबूत असल्याने ते लटकू शकतात. अमेरिकेतील ऑइल बर्ड या एकमेव पक्ष्याप्रमाणे अंधारात प्रवास करून आपले मूळ स्थान शोधण्याची त्यांना कला अवगत आहे. 

बेटे संरक्षित क्षेत्र घोषित करावेंगुर्ला (नीवती) रॉक्स हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचा द्वीपसमूह आहे. या बेटांवर असलेल्या भारतीय पाकोळी पक्षाच्या वसाहतीला वातावरण बदलाचा (climate change) धोका उद्भवला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या आराखड्यात शासनाला काही निर्देश दिले आहेत. जगातील सर्वात समृद्ध असलेली वेंगुर्ला रॉक्स समुद्री बेटावरील भारतीय पाकोळीची वसाहत वाचवायची असेल तर हि बेटे संरक्षित क्षेत्र घोषित करणे गरजेचे आहे. शासनाच्या वन, महसूल, कृषी, पर्यावरण आदी विभागांना सुध्दा यात सहभागी व्हावे लागणार असल्याचे धनुषा कावलकर म्हणाल्या. बर्न आयलँड जगातील सर्वात मोठी वसाहत 

जगात भारतीय पाकोळीच्या १३ वसाहती आहेत. या पैकी भारतात ७ वसाहिती असून वेंगुर्ला (नीवती) रॉक्स बेटांवरील पाकोळी पक्षाची वसाहती जगातील सर्वात मोठी वसाहत आल्याचे समोर आले आहे. येथील २३ बेटांपैकी बर्न आयलँड (Burnt Island) या बेटावर ६१ मी. लांब आणि १८ मी. उंच असलेल्या सागरी गुहेत ही वसाहत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग