सिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरूच, चोरट्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांवर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:14 PM2018-11-16T12:14:24+5:302018-11-16T12:20:17+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला.

Theft in Sindhudurg district | सिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरूच, चोरट्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांवर केला हल्ला

सिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरूच, चोरट्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांवर केला हल्ला

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी फोंडाघाट परिसरातील २ दुकाने आणि ३ बंद घरे फोडलीतंटामुक्त अध्यक्षांवर चोरट्यांनी हल्ला केला.

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच सामानाची नासधूस केली, तर हवेलीनगर मधील भरवस्तीत असणाऱ्या तीन घरांची कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला.

तंटामुक्ती अध्यक्षांवर हल्ला

मध्यरात्री तीन च्या सुमारास  चोरट्यांनी तंटामुक्त अध्यक्ष सुंदर पारकर यांच्या चाळीतील एका बंद खोलीचा कडी कोयंडा तोडत असतानाचा आवाज आल्याने पारकर यांनी आरडा -ओरड केली असता त्यापैकी एका अज्ञाताने पारकर यांच्यावर दगडफेक करत पळ काढला.  सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सरपंच संतोष आग्रे, अजित नाडकर्णी, सुभाष मार्ये, विश्वनाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याबाबत अधिक तपास फोंडाघाट पोलीस करीत आहेत.

Web Title: Theft in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.