सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात परवान्यापेक्षा जास्त वाळू वाहतूक होत असेल, तर त्या वाळूची तपासणी वजन काट्यावर करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच वजनकाट्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच दंडाच्या रकमेत फेरबदल करण्यात येणार नसून, आहे तो दंडच यापुढेही आकारला जाणार असून, अवैधरित्या खडी वाळू वाहतुकीच्या तपासणीसाठी शासनाच्या परिपत्रकानुसार चार सदस्याची समिती नेमण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.सिधुदुर्ग जिल्ह्याला पुढील काही दिवस पुरेल, एवढ्या वाळू उपशाला परवाने दिले आहेत. मात्र, काही डंपर मालक परवान्यापेक्षा जास्त वाळूची वाहतूक करीत असतील, तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी वजनकाट्यांची यंत्रणा जिल्ह्यात प्रथम कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारली जात आहे. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ही रक्कम आम्ही पूर्वीप्रमाणे घेतो. परवान्यावर वाळू कुठे टाकण्यात येणार त्याची दर निश्चिती झालेली असते. त्याप्रमाणे दर आकारला जातो. या दरात कोणताही बदल केला जाणार नाही. जर दरात बदल झाल्यास शासन आमच्या निर्णयावर आक्षेप घेईल. त्यामुळे दंडाचा फेरविचार होणार नसल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लवकरच डंपर वाहतूकदार व वाळू व्यावसायिक यांची संयुक्त बैठक होणार आहे. तशा सुचना पालकमंत्री केसरकर यांनी आम्हाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रशासन आपल्या पध्दतीने काम करीत असून, प्रशासनावर होणाऱ्या टीकेबाबत मी काय बोलू, प्रशासन चांगले काम करीत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अनेक खाणींची तपासणी : अनिल भंडारीसिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण्यापेक्षा जास्त बंदूक परवाने आहेत. अनेक वेळा लोकांची गैरसोय होते. त्यांना वेळेवर जमा केलेले परवाने मिळत नाही, हे खरे आहे. पण मी सर्व अधिकाऱ्यांना कोणालाही परवान्यासाठी थांबवून ठेवू नका, अशा सूचना दिल्या आहेत. अवैधरित्या वाळू वाहतूक करताना दोनपेक्षा जास्त म्हणजे तिसऱ्यांदा डंपर मिळाल्यास त्या डंपरचा परवाना रद्द केला जाणार असल्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.अधिकारी स्वत: खाणीवर जाऊन तपासणी करीत आहेत. मीही अनेक खाणीवर गेलो असून, एटीएस मशिनद्वारे या खाणीची तपासणी केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.जिल्ह्यातील अनेक खाणींची तपासणी : अनिल भंडारीसिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण्यापेक्षा जास्त बंदूक परवाने आहेत. अनेक वेळा लोकांची गैरसोय होते. त्यांना वेळेवर जमा केलेले परवाने मिळत नाही, हे खरे आहे. पण मी सर्व अधिकाऱ्यांना कोणालाही परवान्यासाठी थांबवून ठेवू नका, अशा सूचना दिल्या आहेत. अवैधरित्या वाळू वाहतूक करताना दोनपेक्षा जास्त म्हणजे तिसऱ्यांदा डंपर मिळाल्यास त्या डंपरचा परवाना रद्द केला जाणार असल्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.अधिकारी स्वत: खाणीवर जाऊन तपासणी करीत आहेत. मीही अनेक खाणीवर गेलो असून, एटीएस मशिनद्वारे या खाणीची तपासणी केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दंडाच्या रक्कमेत फेरबदल नाही
By admin | Published: December 28, 2015 11:21 PM