सिंधुदुर्गात चोऱ्यांचे सत्र सुरूच, तंटामुक्त अध्यक्षांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:40 AM2018-11-17T11:40:44+5:302018-11-17T11:42:05+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आत मध्ये प्रवेश करून सामानाची नासधूस केली, तर हवेलीनगर मधील भरवस्तीत असणाऱ्या तीन घरांची कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आत मध्ये प्रवेश करून सामानाची नासधूस केली, तर हवेलीनगर मधील भरवस्तीत असणाऱ्या तीन घरांची कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला.
तंटामुक्ती अध्यक्षांवर हल्ला
मध्यरात्री ३.०० च्या सुमारास चोरट्यांनी तंटामुक्त अध्यक्ष सुंदर पारकर यांच्या चाळीतील एका बंद खोलीचा कडी कोयंडा तोडत असतानाचा आवाज आल्याने पारकर यांनी आरडा-ओरड केली असता त्यापैकी एका अज्ञाताने पारकर यांच्यावर दगडफेक करत पळ काढला.
सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच फोंडा जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सरपंच संतोष आग्रे, अजित नाडकर्णी, सुभाष मोर्ये, विश्वनाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याबाबत अधिक तपास फोंडाघाट पोलीस करीत आहेत.