शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:21 PM2020-11-09T16:21:33+5:302020-11-09T16:23:55+5:30

hospital, medicalcollege, udaysamant, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिले.

Top priority for Government Medical College: Uday Samant | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सर्वोच्च प्राधान्य : उदय सामंत पालकमंत्र्यांकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जागेची पाहणी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय) हॉलची पाहणी शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता जोशी आदी उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांनी यावेळी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शायकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी शासनस्तरावर सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱी जागा हस्तांतरण करण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती यावेळी सादर केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे याची माहिती सादर केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, शासकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा महसूल विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताकडे वर्ग करावी. त्याबरोबर अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही तातडीने करावी.

प्रस्तावासाठी डॉ. मोरे यांना लागणाऱ्या सर्व बाबींची संबंधित यंत्रणांनी पूर्तता करावी. अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या सूचनानुसार आय.टी.आय. मधील लागणारे हॉल वर्ग करून देण्यात यावेत. तसेच महाविद्यायासाठी लागणाऱ्या विविध विभागांसाठी इमारतीची जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभागांनी पाहणी करून तसा अहवाल तातडीने सादर करावा.

Web Title: Top priority for Government Medical College: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.