शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पर्यटन महोत्सवाची धूम

By admin | Published: December 23, 2014 10:20 PM

पाच दिवस कार्यक्रम : नेते, कलाकारांची उपस्थिती

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या ८ व्या पर्यटन महोत्सवाची पाच दिवसांची धूम बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवानिमित्त विविध कलाकार तसेच नेते मंडळी सावंतवाडीत येणार आहेत. हा महोत्सव पहिल्यांदाच शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत होत असल्याने त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी या पर्यटन महोत्सवाची सुरूवात केली आणि आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत असल्याने महोत्सवादरम्यान त्यांचा होणारा नागरी सत्कार हे या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जात आहे.सावंतवाडी नगरपालिका गेली ८ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करीत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे हा महोत्सव तसा रंगीबेरंगी ठरत आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेने प्रथमच महोत्सवाचे आयोजन केले आणि त्याला यशही आले. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक सावंतवाडीत आले आणि येथील व्यापाराही चालना मिळाली. महोत्सवाच्या निमित्ताने शंभराहून अधिक स्टॉल उभारले जातात. या स्टॉलमध्ये खाद्य पदार्थ तसेच नवनवीन कपड्यांचे सेल, भांड्यांचे सेल, वेगवेगळी प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. महोत्सवाच्या पाच दिवसात स्टॉलधारकांचा लाखो रूपयांचा व्यवसाय होतो.सावंतवाडीत पर्यटन महोत्सव हा पाच दिवस चालतो. अवघ्या ३१ डिसेंबरच्या तोंडावर हा महोत्सव येत असल्याने गोव्याला जाणारा पर्यटकही सावंतवाडीत थांबतो, हे विशेष. याचाच नगरपालिकेने पुरेपूर फायदा उचलला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची वैशिष्ट्यही वेगवेगळी आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या महोत्सवाला शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री दीपक सावंत उपस्थित राहणार आहेत, तर समारोपाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अन्य नेते मंडळी येणार आहेत. याच निमित्ताने सावंतवाडीचे सुपुत्र आणि सावंतवाडी महोत्सवाचे जनक, तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याने त्यांचा सत्कार होणार असून हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य मानले जात आहे. पुढील पाच दिवसात विविध कलाकार या महोत्सवात अवतरणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांना विविध मनोरंजनात्मक काय्रक्रमांबरोबरच विविध स्टॉलमधूून विविध पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. (प्रतिनिधी)सावंतवाडीवासीयांसाठी भरगच्च कार्यक्रमसावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाची पाच दिवसांची धूम २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी शाहीर आझाद नायकवाडीचा कार्यक्रम, तर दुसऱ्या दिवशी ‘संसाराची आस’, तिसऱ्या दिवशी झी मराठी सारेगमचा ‘डान्स इंडिया डान्स’चा कार्यक्रम होणार आहे. चौथ्या दिवशी अटल प्रतिष्ठान आयोजित ‘शिवराज्याभिषेक’, तर समारोपाच्या दिवशी ‘जल्लोष २०१४’ आयोजित करण्यात आला आहे.