जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 09:39 PM2020-12-12T21:39:53+5:302020-12-12T21:44:05+5:30

Grampanchyat, Elecation, Sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार आहे.

The trumpets of 70 gram panchayats finally sounded, election program announced: Polling on 15th January | जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले निवडणूक कार्यक्रम जाहीर : १५ जानेवारीला मतदान

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार आहे.

यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम दिसून येणार असून, जिल्ह्यातील निवडणुका भाजप विरुद्ध महविकास आघाडी असेच स्वरूप या निवडणुकीत दिसून येणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यांच्यात जोरदार चढाओढ दिसून येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतीची मुदत संपली होती. मात्र या कालावधीत राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर असल्याने या निवडणूक घेण्यात आल्या नव्हता. या ७० ग्राम पंचायती मध्ये मालवण तालुक्यातील ६, देवगड तालुक्यातील २३, कणकवली तालुक्यातील ३, वैभववाडी तालुक्यातील १३, कुडाळ तालुक्यात ९, वेंगुर्ले तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यातील ११ तर दोडामार्ग तालुक्यात ३ ग्राम पंचायतचा समावेश असून मुदत संपल्याने आणि निवडणूक न लागल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले होते.

आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकिसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठीची सोडत १६ ला काढण्यात येणार आहे.

आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी १५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून या ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच इच्छूक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे.

जिल्ह्यात या निवडणुका जरी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होत असल्या तरी खरी लढत ही भाजपा आणि शिवसनेच्यामध्येच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.

या ७० ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका

देवगड तालुक्यातील धालवली, गढीताम्हाणे, इळये, कातवण, कोर्ले, कुणकेश्वर, लिंगडाळ, मिठबाव, मोंड, मोंडपार, मुणगे, मुटाट, नाडण, पाळेकरवाडी, पाटथर, पुरळ, रहाटेश्वर, शिरगांव, तळवडे, तांबळडेग, टेंबवली, वाडा, वरेरी. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर, तोंडवली- बावशी.

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, आरोस, आंबोली, इन्सुली, डिंगणे, तळवडे, चौकुळ, मळगांव, मळेवाड, कोलगांव, दांडेली. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे, आयनोडे, कुडासे. मालवण तालुक्यातील कुणकवळे, गोळवण-कुमामे, आडवली-मालडी, खरारे-पेंडूर, मसदे-चुनवरे, चिंदर.

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी, लोरे, मांगवली, कोकिसरे, खांबाळे, एडगाव, वेंगसर, सांगुळवाडी, आचिर्ण, नाधवडे, भुईबावडा, कुंभवडे, ऐनारी. कुडाळ तालुक्यातील वसोली, गिरगांव-कुसगांव, माड्याचीवाडी, वाडोस, कुपवडे, गोठोस, आकेरी, पोखरण-कुसबे, गोवेरी. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली आणि सागरतीर्थ या दोन
ग्रामपंचायतचा समावेश आहे.

Web Title: The trumpets of 70 gram panchayats finally sounded, election program announced: Polling on 15th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.