दोन कोटीच्या कामांना मंजुरी

By admin | Published: March 20, 2015 10:54 PM2015-03-20T22:54:49+5:302015-03-20T23:21:22+5:30

सावंतवाडी नगरपालिका बैठक : राजू बेग बैठकीत आक्रमक

Two crore works sanctioned | दोन कोटीच्या कामांना मंजुरी

दोन कोटीच्या कामांना मंजुरी

Next

सावंतवाडी : आपले एवढे काम चांगले आहे की, आम्हाला सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नाही, अशी कोपरखळी नगरसेवक राजू बेग यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना मारली. सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील विकासकामांना मंजुरी घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी काझी दिंडी ते आत्मेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरून बेग यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा रस्ता यापूर्वीच घेतला असल्याने बेग यांचा बार फुसका निघाला.
सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक संजय पेडणेकर, विलास जाधव, अ‍ॅड. अरूण पणदूरकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, माधवी मिशाळ, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.
या बैठकीत माठेवाडा काझी दिंडी ते आत्मेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्ता निविदा प्रकियेत घेतला नसल्याचा आरोप करीत नगरसेवक राजू बेग यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपण बघितल्याशिवाय बोलता, यापूर्वी तुम्ही रस्त्यासाठी माझ्याकडे आला होता का? असा सवाल केला. त्यावर नगरसेवक टेमकर यांनी हा रस्ता या निविदा प्रकियेत असल्याचे नमूद केले. त्यानंतर नगरसेवक बेगही शांत झाले. तुमचे एवढे चांगले काम आहे की, आम्हाला बोलण्याची संधीच मिळत नाही, अशी कोपरखळीही यावेळी त्यांनी मारली. सावंतवाडीच्या पालिका बैठकीत विविध कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. (प्रतिनिधी)

मोती तलावाकाठी फुटपाथ होणार
पालिकेच्या बैठकीत सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यात तेरा कामे असून या कामांना दोन कोटी दहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहेत. यामध्ये आरपीडी हायस्कूल ते शिवप्रसाद लॉज, सबनीसवाडा रस्ता, आत्मेश्वर मंदिर ते कलावती मंदिर, मोती तलावाकाठची फुटपाथ आदी तेरा कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Two crore works sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.