मत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:32 AM2020-01-07T11:32:33+5:302020-01-07T11:33:57+5:30

मालवण : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीन नौकेवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची लाच ...

Two fishermen, including fish commissioners, take action against the bribery department | मत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई

मत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमत्स्य आयुक्तांसह दोघे जाळ्यात, लाचलुचपत विभागाची कारवाई दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मालवण : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीन नौकेवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची लाच मागून त्याचा दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.  त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एक स्थानिक मच्छिमारांची पर्ससीन नौका पकडण्यात आली. हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल, अशी भीती घालत या नौकेबरोबर अन्य एका नौकेवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छिमाराने मान्य केली. याबाबतची तक्रार त्या मच्छिमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला.

शनिवारी सायंकाळी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात सायंकाळी ५ वाजता संबंधित मच्छिमार व्यावसायिक पहिल्या हप्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले.

या कारवाईत लाचलुचपत पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर सहभागी होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची तसेच अटकेची कार्यवाही सुरू होती. उद्या, रविवारी या दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर

रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची तसेच अटकेची कार्यवाही सुरू होती. रविवारी या दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांचा कारभार पाहतात. त्यांच्यावर तसेच नव्यानेच भरती झालेल्या परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाल्याने मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Two fishermen, including fish commissioners, take action against the bribery department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.