उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:41 PM2020-11-30T17:41:59+5:302020-11-30T17:44:10+5:30

Vaibhav Naik, Shiv Sena, Uddhav Thackeray, sindhudurg राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना बळकट करण्यावर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड येथे भात खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी केले.

Uddhav Thackeray government in the interest of farmers: Vaibhav Naik | उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे : वैभव नाईक

आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिनकर परब, विकास राऊळ, विठ्ठल तेली, विजय परब, सचिन कदम, संदीप परब, तात्या आंगणे, सागर वाळके आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे : वैभव नाईकआंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

कुडाळ : राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना बळकट करण्यावर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड येथे भात खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी केले.

बजाज सिंधुदुर्ग राईस मिल, कुडाळ खरेदी-विक्री संघ व आंब्रड सोसायटीच्या माध्यमातून आंब्रड येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुका समन्वयक दिनकर परब, विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, कुंदे सरपंच सचिन कदम, आंब्रड सोसायटी अध्यक्ष संदीप परब, प्रवीण भोगटे, सीताराम दळवी, आबा मुंज, जया परब, शेखर परब, तात्या आंगणे, सागर वाळके, पंढरी देवळी, अनाजी सावंत, पोलीस पाटील देवेंद्र दळवी, सीताराम दळवी, रमेश परब, अनिल परब, अनंत परब, बाळा पाडावे, नारायण राऊळ, सुरेश मुंज, प्रभाकर मुंज, अरविंद मुंज आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
 

Web Title: Uddhav Thackeray government in the interest of farmers: Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.