कुडाळ : राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना बळकट करण्यावर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड येथे भात खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी केले.बजाज सिंधुदुर्ग राईस मिल, कुडाळ खरेदी-विक्री संघ व आंब्रड सोसायटीच्या माध्यमातून आंब्रड येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शिवसेना उपतालुका समन्वयक दिनकर परब, विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, कुंदे सरपंच सचिन कदम, आंब्रड सोसायटी अध्यक्ष संदीप परब, प्रवीण भोगटे, सीताराम दळवी, आबा मुंज, जया परब, शेखर परब, तात्या आंगणे, सागर वाळके, पंढरी देवळी, अनाजी सावंत, पोलीस पाटील देवेंद्र दळवी, सीताराम दळवी, रमेश परब, अनिल परब, अनंत परब, बाळा पाडावे, नारायण राऊळ, सुरेश मुंज, प्रभाकर मुंज, अरविंद मुंज आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते.
उद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे : वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:41 PM
Vaibhav Naik, Shiv Sena, Uddhav Thackeray, sindhudurg राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना बळकट करण्यावर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड येथे भात खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी केले.
ठळक मुद्देउद्धव ठाकरे सरकार शेतकरी हिताचे : वैभव नाईकआंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भात खरेदी केंद्राचा शुभारंभ