उमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:28 AM2020-01-09T10:28:32+5:302020-01-09T10:30:26+5:30

सावंतवाडी येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास ज्या चिठ्ठीभोवती फिरत होता, ती चिठ्ठी अखेर सोमवारी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मात्र, या चिठ्ठीत विशेष असे काहीच नसून, कोणत्याही संशयित व्यक्तींची नावे नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

Umesh Yadav suicide case; Mail before the death of the police | उमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात

उमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देउमेश यादव आत्महत्या प्रकरण; मृत्यूपूर्वीची चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यातसावंतवाडी येथील घटना : पोलिसांकडून चौकशी सुरू

सावंतवाडी : येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास ज्या चिठ्ठीभोवती फिरत होता, ती चिठ्ठी अखेर सोमवारी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मात्र, या चिठ्ठीत विशेष असे काहीच नसून, कोणत्याही संशयित व्यक्तींची नावे नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

उमेश यादव यांनी चार दिवसांपूर्वी मोती तलावात आत्महत्या केली होती. या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले होते. तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिला होता. स्था

निक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांचे पथक सावंतवाडीत ठाण मांडून असून, ते तपास करीत आहेत. त्यामुळे सध्यातरी हे प्रकरण येथेच थांबले असून आता पोलीस मृत उमेश यांना मृत्यूच्यापूर्वी फोन केले होते का याची माहिती घेणार असून त्याचे सीडीआरही पाठविल्याचे सांगितले.

या प्रकरणात आणखी काय माहिती मिळते का? याचीही खातरजमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाबाबत दररोज आम्ही पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांना माहिती देत असून तेही आम्हांला मार्गदर्शन करीत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांनी सांगितले.

पोलिसांकडून त्या चिठ्ठीची शहानिशा

पहिले काही दिवस या प्रकरणाचा तपास उमेश यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीभोवती फिरत होता. मात्र, कुटुंबाने आपली सध्या मानसिक स्थिती चांगली नसल्याने आपण चिठ्ठी देऊ शकत नाही असे सांगितले होते. मात्र, सोमवारी ही चिठ्ठी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली असून, पोलिसांनी या चिठ्ठीची शहानिशा केली. मात्र, त्यात विशेष असे काहीच नसल्याचे सांगितले. तसेच सावंतवाडीत ज्या उलटसुलट अफवा पसरविल्या जात होत्या, तशी नावेही कोणाची नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Web Title: Umesh Yadav suicide case; Mail before the death of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.