कणकवली: कणकवली शहरासह वागदे, ओसरगाव, कसाल, ओरोस, कुडाळ आदी भागात आज, शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली.सकाळीच कामावर जाणाऱ्यांकडे छत्री, रेनकोट असे साहित्य नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले. या पावसाचा फटका विक्रेते तसेच व्यापाऱ्यांनाही काही प्रमाणात बसला. वातावरणातील बदलामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.गेला आठवडाभर उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, आज, सकाळी पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
कणकवलीत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
By सुधीर राणे | Published: April 20, 2024 12:25 PM